१. सकाळी कपाळावर श्री गणेशाची दोन हात उंचावलेली प्रतिमा उमटल्याचे दिसणे आणि त्या वेळी प्रसन्न वाटून मन निर्विचार होणे : ‘८.१.२०२० या दिवशी सकाळी ७ वाजता माझ्या कपाळावर श्री गणेशाची दोन हात उंचावलेली आणि त्या दोन्ही हातांमध्ये पाश अन् अंकुश असलेली प्रतिमा उमटली असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘त्या मूर्तीच्या मुखामधून प्रकाश बाहेर पडत होता’, असे मला दिसले. त्या वेळी मी भ्रमणभाषद्वारे माझ्या कपाळाचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ती प्रतिमा छायाचित्रात येत नव्हती. त्या वेळी मला प्रसन्न वाटून माझे मन निर्विचार झाले होते. रात्री जागरण झाले असूनही मला थकवा जाणवत नव्हता.
२. तासाभराने गणेशाची प्रतिमा लुप्त होऊन त्या ठिकाणी कमळाची प्रतिमा उमटणे : तासाभराने सकाळी ८ वाजता ती प्रतिमा जाऊन त्या ठिकाणी कमळाची प्रतिमा उमटली. त्या वेळी माझे मन सकारात्मक होते आणि ‘मला साधना अजून वाढवली पाहिजे’, असे विचार माझ्या मनामध्ये येत होते. त्या वेळी माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
३. सायंकाळी ७ वाजता कमळाची प्रतिकृती जाऊन त्या ठिकाणी कळी उमटली; परंतु त्या वेळी वेगळे काही जाणवले नाही.
४. ‘रात्री ८ नंतर थकवा जाणवून लवकर झोपावे’, असे वाटत होते.’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद , पनवेल. (८.१.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |