‘अपना बझार’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेतून सर्वांना मिळालेला आनंद !

‘अपना बझार’ने वर्ष २०२१ मध्ये दीपावलीनिमित्त प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यात सनातन संस्थेनेही ग्रंथप्रदर्शन लावले होते.

पुष्पांजली पाटणकर

१. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला मिळालेला सुंदर अभिप्राय !

१ अ. सर्वांत सात्त्विक, स्वच्छ आणि सुंदर ग्रंथप्रदर्शन ! : सनातन संस्थेचे हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘अपना बझार’च्या महिला गटाच्या प्रमुख सौ. सुचेता इनामदार यांच्या वतीने सौ. गीता कित्तूर आमच्याशी वार्तालाप करतांना म्हणाल्या, ‘‘सर्वांत सात्त्विक, स्वच्छ आणि सुंदर ग्रंथप्रदर्शन आहे.’’ हा संदेश सहस्रो भ्रमणभाषवर गेला. यातून देवाने भरभरून आनंद दिला.

२. सेवेतून सर्वच साधकांना आनंद मिळणे

या ३ दिवसांच्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी पुष्कळ साधक आले होते. पुष्कळ दिवसांनी साधक एकमेकांना आनंदाने भेटले. साधकांनी त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेनुसार मिळेल ती सेवा केली. सर्व जण ‘पुन्हा ग्रंथप्रदर्शन लावूया’, असे म्हणाले. सगळे साधक एकदम आनंदी होते. डब्यातील जेवण आणि खाऊ आदान-प्रदान झाले. तुझ्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेचा उल्लेख झाला.

‘असाच निरपेक्ष आनंद तू नित्य द्यावास’, अशी तुझ्या चरणी विनंती !

– कृष्णपुष्प (पुष्पांजली, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बेळगाव (३०.१०.२०२१)