युक्रेनच्या सैन्याने आत्मसमर्पण केल्यास कारवाई थांबवू ! – रशियाचे संरक्षणमंत्री

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा ५६ वा दिवस आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर झुकायला सिद्ध नाहीत. रशियन सैन्य अधिकाधिक आक्रमक होत असतांना युक्रेनचे सैन्य अमेरिका आणि इतर बलाढ्य देशांच्या साहाय्याने युद्धात उभे आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘युक्रेनच्या सैन्याने आत्मसमर्पण केल्यास पुढील कारवाई करणार नाही’, असे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

रशियाचे सैन्य जगातील सर्वांत क्रूर सैन्य ! – झेलेंस्की

रशियाचे सैन्य हे जगातील सर्वांत क्रूर सैन्य आहे. त्याचा मानवतेशी काहीही संबंध नाही, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांनी केले आहे.

अमेरिका युद्ध संपवण्याच्या मन:स्थितीत नाही !

अमेरिका पुन्हा एकदा युक्रेनला सैनिकी साहाय्य पुरवणार असल्याची माहिती अमेरिकन संरक्षण मंत्रालय ‘पेंटागॉन’ने दिली आहे. रशियाचे वर्चस्व अल्प करण्यासाठी हे महायुद्ध संपुष्टात येऊ नये, असे अमेरिकेला वाटत आहे, असे यावरून म्हटले जात आहे.