साधनेमुळे देवाशी भावबंध निर्माण होऊन कुठल्याही परिस्थितीत समाधानी रहाता येणे

पुष्पांजली पाटणकर

१. मृत्यूच्या संदर्भात अनेक जण हेच वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त करत असणे

अ. ‘आमच्या अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या !

आ. मरण येत नाही; म्हणून जगतोय !

इ. देव कधी घेऊन जाणार कुणास ठाऊक ?

ई. देव न्यायची वाट पहातोय ! इत्यादी.

२. देवाशी बोलतांना देवाने त्याच्याजवळ घेऊन जाणार असल्याचे सांगणे

देवा, मी पूजा करतांना श्री गजाननाला म्हणाले, ‘तू आम्हाला साधनेसाठी धरतीवर पाठवलेस. तू आमचा हात सोडलास आणि आम्हाला श्रीविष्णूच्या हाती सोपवलेस. तुला आनंद झाला ना ?’ असे बोलतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. ‘देवा, कृष्णा, आता तू आमचे जीवन कधी संपवणार ?’ कृष्ण हसला अन् म्हणाला, ‘असे म्हणू नकोस. मी तुला माझ्याजवळ घेऊन येणार आहे.’

३. ‘भाऊसाहेब अंथरुणावर पडूनही साधनेमुळे किती समाधानी आहेत ?’, हे इतरांना शिकवायचे आहे’, असे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगणे

भाऊसाहेब (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पहिले शिष्य) श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना म्हणाले, ‘‘आता माझ्या वयाला ९३ वर्षे पूर्ण झाली. महाराज, आता सोडवा.’’ महाराज म्हणाले, ‘‘अशा परिस्थितीतही आणि अंथरुणावर पडूनही तुम्ही किती समाधानी आहात’, हे मला तुमच्याकडून लोकांना शिकवायचे आहे.’’

– कृष्णपुष्प (पुष्पांजली, (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)), बेळगाव (३०.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक