‘३०.१०.२०२१ या दिवशी दुपारी ३ ते ३.५० या वेळेत मी डोळे मिटल्यावर मला समोर एक दृश्य दिसले. ‘मी मार्गाच्या बाजूने चालले आहे. पदपथाच्या बाजूला असलेल्या भिंतीवर मातीच्या २ लाल सुंदर, स्वच्छ आणि गुळगुळीत मूर्ती आहेत. त्या मूर्ती बहुदा बुद्धाच्या असाव्यात. मी थांबून त्याकडे पहात असतांना अकस्मात् त्या मूर्तींनी थोडी मान झुकवली आणि दोन्ही हात जवळ घेऊन मला नमस्कार केला.’ जणू निर्जीव मूर्तीतून सजीवत्व प्रकट झाले !
प्रश्न : देवराणा (परात्पर गुरु डॉ. आठवले), सांग ना, त्या मूर्तींना मला नमस्कार का करावासा वाटला ?
(परात्पर गुरु) डॉ. आठवले : साधना चांगली आहे; म्हणून अनुभूती आली.
देवा, तू दैनिकात प्रतिदिन लिहितोस, ‘जागेअभावी साधकांच्या अनुभूती छापता येत नाहीत’; पण आमच्या अनुभूती कुणाला खऱ्या वाटतात, तर कुणाला खोट्या ! त्या अनुभूती मला देवानेच दिलेल्या आहेत. ‘देवाला त्या आम्हाला लिहून द्याव्याशा वाटतात आणि आम्हाला त्या तुलाच सांगाव्याशा वाटतात’, हीसुद्धा देवाचीच इच्छा नव्हे का ?’
– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बेळगाव (३०.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |