आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते १५ एप्रिल २०२२ या दिवशी येथे आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.

पू. किरण फाटक

या कार्यक्रमाचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि अन्य साधकांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत

१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजप लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१ अ. लोकार्पणापूर्वी आणि नंतर नामजपातील स्पंदनांचे प्रमाण

पू. किरण फाटककाकांनी नामजपांचे लोकार्पण केल्यामुळे आरंभी नामजपात असलेले शक्तीचे प्रमाण न्यून झाले आणि त्यातून प्रक्षेपित होणारे भाव, चैतन्य अन् आनंद यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे शांतीचे प्रमाणही काही अंशी अल्प झाले.

१ आ. या वेळी वातावरण पुष्कळ प्रकाशमान झाले होते.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पी.एच्डी. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

२. सनातनच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी हे नामजप ऐकल्यावर केलेले सूक्ष्म परीक्षण

कु. मधुरा भोसले

पू. किरण फाटककाकांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांनीच नामजपाचे लोकार्पण केल्याचे जाणवले. पू. काकांच्या हस्तस्पर्शाने त्यांच्या देहातील चैतन्य आय-पॅड मध्ये जाऊन नामजपातील सात्त्विक ध्वनीच्या माध्यमातून वातावरणात पसरले. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी झाले.

३. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

श्री. मनोज सहस्रबुद्धे

अ. ‘शून्य’ नामजप ऐकतांना सगुण-निर्गुण स्पंदने जाणवली.

आ. ‘महाशून्य’ नामजप ऐकतांना निर्गुण-सगुण स्पंदने जाणवली.

इ. ‘निर्गुण’ नामजप ऐकतांना अधिक निर्गुण स्पंदनेच जाणवली.

(सर्व सूत्रांचा दिनांक १५ एप्रिल २०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.