|
स्टॉकहोम (स्विडन) – स्विडनमधील अनेक शहरांत शरणार्थी धर्मांध आणि डेन्मार्क येथील इस्लामविरोधी पक्ष असलेल्या ‘स्ट्राम कुर्स’चे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. ‘स्ट्राम कुर्स’ पक्षाकडून कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्यानंतर हा हिंसाचार झाला. यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तसेच दगडफेक करण्यात आली. यात काही पोलीसही घायाळ झाले. या वेळी धर्मांधांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा देण्यात आल्या. देशातील नॉरकोपिंग, रिंकीबी, स्टॉकहोम, ओरेब्रो यांसह अन्य शहरांत हा हिंसाचार झाला.
Riots erupt in Sweden’s Orebro ahead of right-wing extremist demonstration https://t.co/hSF09IjTu8 pic.twitter.com/O9b1HscNfq
— Reuters (@Reuters) April 15, 2022
१. ओरेब्रो येथे पोलिसांच्या ४ वाहनांची जाळपोळ करण्यात आली. येथे ४ पोलीस आणि एक नागरिक घायाळ झाले. येथे धर्मांधांनी पोलिसांची एक गाडीही पळवून नेली.
२. या हिंसाचाराविषयी स्विडनचे पंतप्रधान मॅग्डेलेना अँडरसन म्हणाले की, या हिंसाचाराचा मी निषेध करतो. या हिंसाचारात अनेक पोलीस घायाळ झाले आहेत.
३. डेन्मार्क देशातील ‘स्ट्रॉम कुर्स’ पक्षाचे अध्यक्ष रासमस पलुदान यांनी ‘स्विडनच्या लिंकोपिंग या शहरातील मुसलमानबहुल भागात कुराण जाळण्यात येईल’, अशी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी येथे कुराण जाळले. पोलिसांनीही याला अनुमती दिली होती. या जाळपोळीनंतर २०० हून अधिक धर्मांधांनी संघटित होऊन विरोध केला.
वर्ष २०२० मध्येही स्विडनमध्ये झाली कुराण जाळल्यामुळे झाली होती दंगल !
यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये स्विडनच्या माल्मो शहरात ‘स्ट्राम कुर्स’ पक्षाकडून कुराण जाळण्यात आल्यानंतर दंगल उसळली होती. पोलिसांनी रासमस पलुदान यांना स्विडनमध्ये प्रवेश केल्यामुळे अटक केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी कुराण जाळले होते.