गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय उपस्थित केल्यानंतर पुण्यातील मनसेच्या मुसलमान पदाधिकाऱ्यांनी पदांचे त्यागपत्र दिले. दुसरीकडे मध्यप्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी अन् हनुमान जयंती साजरी करण्याच्या लेखी आदेशावर काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी आक्षेप घेतला.
या दोन्ही घटनांवरून ‘मुसलमान प्रथम मुसलमान असतो; मग तो कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असतो’, असे लक्षात येते. एखाद्या पक्षाची ध्येयधोरणे धर्माला पूरक असेपर्यंत मुसलमान त्या पक्षाशी एकनिष्ठ रहातात; मात्र ती मारक झाल्यास त्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास ते मागे पुढे पहात नाहीत, म्हणजेच मुसलमान धर्माला प्राधान्य देतात. आम्ही हिंदू मात्र एखाद्या पक्षाची ध्येयधोरणे हिंदु धर्माला कितीही मारक असली, तरी त्या पक्षाशी एकनिष्ठ रहातो. त्यामुळेच धर्माभिमानी अल्पसंख्यांकांकडून धर्माभिमानशून्य आम्ही बहुसंख्यांक हिंदू सातत्याने मार खातो. ज्या देशात अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांक मार खातात, असा भारत जगातील एकमेव देश असावा, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. – श्री. श्रीकृष्ण नारकर, पाचल, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी