(म्हणे) ‘हिंदू मुसलमानबहुल भागात जात असल्याने श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणाला हिंदूच उत्तरदायी !’

ढोंगी धर्मनिरपेक्षातवाद्यांचा युक्तीवाद

  • भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, तर प्रत्येक धर्मियाला राज्यघटनेने देशात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे जर हिंदू पालन करत असतील, तर ते चुकीचे कसे ? – संपादक
  • मुसलमानांच्या भागात हिंदूंनी जाऊ नये; कारण मुसलमान त्यांच्यावर आक्रमण करणारच, असे या धर्मनिरपेक्षतावाद्यांना म्हणायचे आहे, तर या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तर मुसलमानांनी या देशात राहूच नये, असे हिंदूंनी म्हटल्यास चुकीचे ते काय ? – संपादक

नवी देहली – देशात श्रीरामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी मुसलमानबहुल भागांतून मिरवणुकांवर आक्रमण करण्यात आले होते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे हिंदूंनाच दोषी ठरवत ‘हिंदू मुसलमानबहुल भागात धार्मिक मिरवणुका घेऊन जातातच कशाला ?’ असा प्रश्‍न उपस्थित करत आहेत.

करौली (राजस्थान) येथे झालेल्या घटनेवरून राजस्थान पोलिसांचे म्हणणे आहे की, मुसलमानबहुल भागात हिंदूंनी भडकाऊ गाणे वाजवल्याने हिंसाचार झाला.