श्रीरामनवमीच्या आधी स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले प्रभु श्रीरामाच्या रूपात सिंहासनावर आशीर्वादाच्या मुद्रेत बसलेले दिसणे आणि त्यांच्याकडून येणाऱ्या पिवळ्या प्रकाशामुळे चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होत असल्याचे जाणवणे

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. श्रिया राजंदेकर

‘६.४.२०२२ च्या रात्री मला स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रभु श्रीरामाच्या रूपात दर्शन झाले. त्या वेळी ते माझ्याकडे स्मितहास्य करून पहात होते. ते सिंहासनावर आशीर्वादाच्या मुद्रेत बसलेले दिसत होते. त्यांनी माझ्याकडे पाहून आशीर्वादाची मुद्रा केली. त्या क्षणी ‘त्यांच्या हातातून पिवळा प्रकाश येत आहे आणि माझ्याभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला वाटले. त्यांच्याकडे पहातांना मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘त्यांचे चैतन्य माझ्या मनामध्ये आहे’, असे मला जाणवले.

सकाळी जाग आल्यावर श्रीरामनवमीच्या आधी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला श्रीरामाच्या रूपात दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– गुरुदेवांच्या चरणांवरील छोटेसे फूल,
कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे), फोंडा, गोवा. (९.४.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक