मुंबई येथील काही हितचिंतक, धर्मप्रेमी आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक यांचे मनोगत !

१. हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत

१ अ. प्राध्यापक संपत कणसे, ठाणे : तुमचे गुरु अतिशय ज्ञानी आहेत. मला आश्रमात येण्याची इच्छा आहे.

१ आ. गीता मोहरे, बोरीवली, मुंबई : आता परात्पर गुरु डॉ. आठवले जे सांगतील, त्याप्रमाणेच मला करायचे आहे.

२. धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

२ अ. सौ. भूमिका पुजारी, कांदिवली, मुंबई : सनातनचे साधक ‘पुढे आपत्काळ येणार आहे’, असे सांगायचे. तो आपत्काळ आता या दळणवळण बंदीच्या काळात खरोखर दिसून येत आहे. ‘अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तू, ‘इलेक्ट्र्रिशियन’, अशी ज्यांची आपल्याला नेहमी आवश्यकता भासते, ते मिळत नाही’, हे आम्ही अनुभवत आहोत.’

३. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांनी व्यक्त केलेले मनोगत

३ अ. कमल राऊत, अंधेरी, मुंबई : ‘सनातन प्रभात’चा अंक देतांना ‘तुम्ही भविष्यात आपत्काळ येईल’, असे सांगत होतात. त्या वेळी ते लक्षात येत नव्हते. ते आता लक्षात आले.

३ आ. सौ. श्रावणी सावंत, सांताक्रूझ, मुंबई : ‘आपत्काळ येणार’ हे खरे वाटत नव्हते; पण गुरुदेवांनी सांगितले, तसेच घडत आहे. कोरोनामुळे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली. ‘यासाठी साधनाच करायला पाहिजे’, हे समजले.

३ इ. सौ. उषा बच्छाव, बोईसर, पालघर : सनातन संस्था आधीपासूनच आपत्काळाविषयी सांगत होती आणि तसेच आता घडत आहे.

३ ई. सौ. राजश्री भुजंग, बोईसर, पालघर : परात्पर गुरु डॉ. आठवले आधीपासूनच आपत्काळ आणि साधना यांविषयी सांगत होते. त्यानुसार आता घडत आहे. आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साधना करायला पाहिजे.

३ उ. सौ. राखी सावंत, मीरारोड, पालघर : ‘तुम्ही सांगत होता, तो आपत्काळ आला आहे’, असे वाटते. ‘अशी परिस्थिती येईल’, हे सनातन मागील २ वर्षांपासून सांगत आहे, ते आता खरे होत आहे.

३ ऊ. सौ. सुलभा म्हात्रे, श्री विजय सावे आणि श्री. कुमुद सोनार, बोईसर, पालघर : तुम्ही जे पूर्वीपासून सांगत होता, सगळे तसेच चालू आहे.