रात्री अंथरुणावर पहुडल्यावर ‘श्रीरामाच्या चरणांना स्पर्श करावा’, असा मनात विचार येणे आणि त्या क्षणी जाईच्या फुलांचा सुगंध येऊन श्रीरामाचे अस्तित्व जाणवणे

कु. महानंदा पाटील

‘२३.३.२०२१ या दिवशी मी रात्री अंथरुणावर पहुडले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘श्रीरामाच्या चरणांना स्पर्श करावा.’ हा विचार मनात येताक्षणीच मला जाईच्या फुलांचा सुगंध आला आणि ‘श्रीराम माझ्याजवळ आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला जाणवले, ‘मला श्रीरामाला भेटायचे आहे’, हा माझ्या मनातील विचार श्रीरामाला लगेच कळला आहे.’ मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीराम माझ्यासमोर उभा आहे. मला श्रीरामाचे अस्तित्व जाणवत होते; पण माझे हात श्रीरामाच्या चरणांपर्यंत पोचले नाहीत. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘देवाची भक्ती अजून पुष्कळ वाढवायला पाहिजे. भक्ती वाढली, तर देव जवळ येईल !’

श्रीरामाची दासी,

– कु. महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक