श्रीरामनवमीच्या काळात घेतलेल्या भावप्रयोगांमुळे सकारात्मकता वाढून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेता येणे

१. संगीत सेवेच्या ठिकाणी ‘भावविश्व’ आले असल्याचे जाणवणे

कु. शर्वरी कानस्कर

श्रीरामनवमी जवळ आल्याने आढाव्यात प्र्रतिदिन श्रीरामाच्या संदर्भात भावप्रयोग घ्यायचे ठरले. त्या वेळी असे वाटायचे की, आज गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सहसाधिकांच्या भावप्रयोगातून त्यांच्या भावविश्वात घेऊन जाणार आहेत आणि एक वेगळीच भावस्थिती अनुभवायला देणार आहेत. गुरुदेवांच्या कृपेमुळे आढाव्याच्या वेळी २ – ३ वेळा मला ‘संगीत सेवेच्या ठिकाणी ‘भावविश्व’ आले आहे’, असेही जाणवले.

२. भावप्रयोगांमुळे सर्वांचे भावाश्रू गुरुदेवांच्या चरणी अर्पण होऊन त्यातून एक मोठा भाववृक्ष निर्माण झाल्याचे जाणवणे

‘भावविश्व हा गुरुदेवांचा विष्णुलोक आहे’, असे जाणवून साधक भावप्रयोग सांगत असतांना वातावरणात गारवा जाणवायचा. भावप्रयोगांमुळे सगळ्यांची भावजागृती झाल्यावर ‘सर्वांचे भावाश्रू गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाले आहेत आणि त्या भावाश्रूंनी एक मोठा भाववृक्ष निर्माण झाला आहे’, असे मला वाटायचे.

३. भावप्रयोगांमुळे कोणत्याही प्रसंगात ताण न येता सकारात्मकता वाढून गुरुदेवांनी प्रतिदिन आनंदाची अनुभूती देणे

श्रीरामनवमीच्या ९ दिवसांच्या कालावधीत घेतलेल्या भावप्रयोगांमुळे मला कोणत्याही प्रसंगाचा ताण आला नाही आणि गुरुदेवांनी मला प्रतिदिन आनंदाची अनुभूती दिली. या भावप्रयोगांमुळे मनात सकारात्मकता आली. तसेच ‘दिवसभरात कोणता भाव ठेवायचा ? आज कोणता आदर्श घेऊन प्रयत्न करायचे ? नकारात्मक प्रसंग आल्यावर त्यातून लगेच बाहेर पडून देवाशी एकरूप कसे व्हायचे ?’, हे माझ्या लक्षात आले.

४. भावप्रयोगाच्या वेळी गुरुदेवांच्या कृपेमुळे मनातील विचार हळूहळू अल्प होणे

एक साधिका भावप्रयोग घेत असतांना ‘माझ्या मनात असंख्य विचार चालू आहेत’, असे मला वाटत होते; पण गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनातील विचार हळूहळू अल्प झाले आणि साधिका सांगत असलेला भावप्रयोग मला अनुभवता आला.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, आपल्या चरणी खारूताईप्रमाणे क्षमतेचा पूर्ण उपयोग करून मला सेवा करता येऊदे आणि आपली दास्यभक्ती करण्यासाठी आपणच माझ्याकडून हनुमंताप्रमाणे प्रयत्न करवून घ्यावेत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. श्रीरामरूपी गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीच्या वर्षावामुळे माझी काही पात्रता नसतांना मला हे अनुभवता आले, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !

– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), दुर्ग, छत्तीसगड. (२२.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक