‘पी.एफ्.आय.’च्या जिहादी कार्यकर्त्यांना अग्निशमन प्रशिक्षण दिल्याने केरळचे २ पोलीस अधिकारी निलंबित !

  • एका जिहादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सरकारकडून प्रशिक्षित केले जाणे, हे अत्यंत गंभीर सूत्र आहे ! अर्थात् मुसलमानांची तळी उचलणार्‍या साम्यवादी केरळ सरकारच्या पोलिसांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार ? – संपादक
  • केंद्र सरकारने अशा ‘पी.एफ्.आय.’वर तात्काळ बंदी आणावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक
‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण देताना पोलीस

थिरूवनंतपूरम् (केरळ) – जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले. ३० मार्च या दिवशी अलुवा येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केरळ पोलिसांच्या अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले होते. विश्व हिंदु परिषदेने हे सूत्र उपस्थित करून कारवाईची मागणी केली.

मुसलमानांचे तुष्टीकरण केल्याचा आरोप

विश्व हिंदु परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी या प्रकरणी म्हटले की, सरकारी संस्था अशा संघटनांना प्रशिक्षण देऊन मुसलमानांना खुश करत आहे