आता या सूत्रावरून पुरो(अधो)गाम्यांनी आकाश-पाताळ एक केल्यास आश्चर्य वाटू नये !
आता या कारवाईविरुद्ध गळे काढणारे कधी या धर्मांध विद्यार्थिनींनी शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब न घालण्याविषयीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी चकार शब्द काढणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा देण्याची अनुमती देणार्या गदग जिल्ह्यातील ७ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. एस्.यू. होक्कलड, एस्.एम्. पत्तर, एस्.जी. गोडके, एस्.एस्. गुजामगडी, व्ही.एन्. किवूदार, के.बी. भजंत्री आणि बी.एस्. होनागुडी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे अन्वेषण करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च या दिवशी घडली असून त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संबंधित शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली. श्रीराम सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेनेही या शिक्षकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
7 teachers suspended for allowing hijab wearing students to write exams in Karnataka https://t.co/vd09oMjP3A
— Hindustan Times (@HindustanTimes) March 31, 2022
या घटनेसंदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने उच्च न्यायालयाचे अधिनियम आणि निर्णय यांना अनुसरून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना हिजाबसंबंधी निर्देश दिले आहेत. जे सरकारी कर्मचारी या आदेशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. त्यामुळेच या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.
उडुपी जिल्ह्यातील ४० धर्मांध विद्यार्थिनींचा परीक्षेवर बहिष्कार !
सश्रद्ध हिंदूंना ‘मागासलेले’ संबोधून त्यांच्या विरोधात गरळओक करणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे हिजाब प्रकरणी मात्र धर्मांध विद्यार्थिनींची बाजू घेतात, हे लक्षात घ्या ! हिजाबसाठी परीक्षेवर बहिष्कार घालणे, हा त्यांना आता मागसलेपणा वाटत नाही का ? – संपादक
दुसरीकडे उडुपी जिल्ह्यातील ४० धर्मांध विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यापासून रोखल्याने त्यांनी २९ मार्च या दिवशी १२ वीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. यांपैकी कुंडापूर येेथील २४ विद्यार्थिनी, बिंदूर येथील १४, तर ‘उडुपी सरकारी कन्या पीयू कॉलेज’च्या २ विद्यार्थिनी यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी निर्णय देतांना सांगितले होते की, ‘हिजाब’ ही इस्लामची अनिवार्य प्रथा नसून शैक्षणिक संस्थानांमध्ये त्यावर बंदी कायम राहील.
बागलकोट जिल्ह्यातीलही काही धर्मांध विद्यार्थिनींचा परीक्षेवर बहिष्कार !
अशाच प्रकारे बागलकोट जिल्ह्यातील इलकल भागातील हिजाब परिधान केलेल्या काही धर्मांध विद्यार्थिनींना परीक्षा देण्याची अनुमती नाकरल्यानंतर त्यांनीही परीक्षेपेक्षा हिजाबला प्राधान्य देत परीक्षेवर बहिष्कार घातला.
एक हिजाबप्रेमी शिक्षिकाही निलंबित !
बेंगळुरू येथे २८ मार्च या दिवशी १० वीच्या बोर्डा परीक्षेसाठी गेलेल्या आणि हिजाब परिधान केलेल्या नूर फातिमा नावाच्या शिक्षिकेलाही निलंबित केल्याची घटना नुकतीच घडली.
बहुतांश मुसलमान विद्यार्थिनींकडून हिजाबपेक्षा परीक्षेला प्राधान्य !
या काही घटना वगळता बहुतांश मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाबपेक्षा परीक्षेला प्राधान्य दिले. (बहुतांश मुसलमान विद्यार्थिनींनी परीक्षेला प्राधान्य देणे, यातून हिजाब प्रकरणाचा बागुलबुवा केला जात आहे, हेच अधोरेखित होते ! – संपादक)