पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर ३१ मार्चला चर्चा होणार

विरोधी आघाडीकडून शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा

पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर ३१ मार्च या दिवशी चर्चा होणार आहे. त्यानंतर मतदान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विरोधकांना २१० हून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमताचा आकडा १७२ आहे. ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंट’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. ते पाकिस्तानातील पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आधीच निश्चित मानले जात होते.

पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये तीनही प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश आहे. पीएम्एल्-एन्, आसिफ अली झरदारी यांचा पीपीपी आणि मौलाना फझल-उर-रहमान यांचा जेयूआय-एफ अशी या पक्षांची नावे आहेत.