रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

१. डॉ. राजन लंबोर, माशेल, गोवा

आश्रमात अध्यात्म प्रत्यक्ष जगले जाते ! : ‘आश्रम पहाणे, हीच माझ्यासाठी एक अनुभूती आहे. एखाद्याला ‘अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्मात नेमके काय शिकावे ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर त्याने आश्रमात यावे. येथे अध्यात्म प्रत्यक्ष जगले जाते. ‘कुणीही येथे येऊन अनुभूती घ्यावी’, असे मी सर्वांना आवर्जून सांगीन.’ (२७.२.२०२२)

२. प्राध्यापक सुरिंदर कौर, रोहतक, हरियाणा

‘आश्रम हे एक छोटे जगच असून सर्व साधक समर्पणभावाने एकमेकांना साहाय्य करत आहेत ! : ‘सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी ‘इतर विश्वविद्यालयाप्रमाणेच हे एक विश्वविद्यालय असेल’, असे मला वाटले होते; मात्र येथे आल्यावर ‘हे एक छोटे जगच आहे’, असे माझ्या लक्षात आले. येथील सर्व साधकांमध्ये एकमेकांविषयी प्रेम आणि जवळीक दिसून येते. सर्व साधक समर्पणभावाने एकमेकांना साहाय्य करतात आणि नि:स्वार्थी वृत्तीने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. येथील व्यवस्थापनही उत्कृष्ट आहे.’ (६.३.२०२२)