गोमांस कढी न मिळाल्याच्या रागातून ख्रिस्ती तरुणाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जण घायाळ !

इडुक्की (केरळ) – येथील मूलमट्टम् भागामध्ये २६ मार्चच्या रात्री २६ वर्षीय तरुण फिलिप मार्टिन याने गोमांस कढी न मिळाल्याच्या रागातून केलेल्या गोळीबारात सनाल बाबू यांचा मृत्यू झाला, तर अन्य २ जण घायाळ झाले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. तेथील लोकांनी विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने पिस्तुल आणून गोळीबार केला.