रामनवमी मिरवणुका आणि गुढीपाडवा शोभायात्रा यांना अनुमती द्या ! – भाजपचे आमदार आशिष शेलार यांची मागणी

आशिष शेलार

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – रामनवमीच्या मिरवणुका आणि गुढीपाडवा शोभायात्रा यांना शासनाने अनुमती द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत केली. आमदार आशिष शेलार म्हणाले की, राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होण्यास प्रारंभ झाला आहे. १० एप्रिल या दिवशी रामनवमीच्या निमित्ताने राज्यात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मिरवणुका काढल्या जातात, तसेच २ एप्रिल या दिवशी गुढीपाडवा असून मराठी नववर्षाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते. ‘या मिरवणुका आणि शोभायात्रा यांना सरकारने अनुमती देण्याविषयी निवेदन करावे’, अशी मागणी त्यांनी केली.