पू. (श्रीमती) सुमन नाईक यांना स्वत:हून उत्साहाने साहाय्य करणारी रामनाथी येथील कु. सानिका सुनील सोनीकर !

पू. (श्रीमती) सुमन नाईक यांना स्वत:हून उत्साहाने साहाय्य करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी (गोवा) येथील कु. सानिका सुनील सोनीकर (वय १६ वर्षे) !

पू. (श्रीमती) सुमन नाईक

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सानिका सोनीकर ही या पिढीतील एक आहे !

सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी, वय ७३ वर्षे) या काही दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होत्या. तेव्हा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. सानिका सुनील सोनीकर ही पू. सुमनमावशी यांना साहाय्य करत होती. फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी (२४.३.२०२२) या दिवशी कु. सानिका हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त सानिकाशी झालेल्या संभाषणातून पू. सुमनमावशींना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. सानिका सोनीकर

कु. सानिका सोनीकर हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. कु. सानिका हिने ‘मी जन्मापासूनच साधनेत आहे’, असे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना जन्मापासूनच घडवत असल्याचे जाणवून कृतज्ञता वाटणे

‘एकदा माझे कु. सानिका हिच्याशी पुढील संभाषण झाले.

पू. सुमनमावशी : तू कितवी शिकली आहेस ?

कु. सानिका : मी इयत्ता ८ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पू. सुमनमावशी : तू साधनेत कधीपासून आहेस ?

कु. सानिका : जन्मापासूनच !

सानिकाचे हे उत्तर ऐकल्यावर माझ्या मनात आले, ‘पाषाणाच्या मूर्तीला घडवतांनाही काहीतरी चुकते; परंतु गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही या जिवांना जन्मापासूनच प्रत्येक क्षणाला घडवत आहात.’ त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नऊवारी साडी वाळत घालायला शिकले असल्याचे सांगून आनंदाने नऊवारी साडी वाळत घालणारी कु. सानिका !

एकदा सानिका माझी नऊवारी साडी वाळत घालत असतांना आम्हा दोघीत पुढील संभाषण झाले.

पू. सुमनमावशी : ती नऊवारी साडी आहे ना ! तुला उचलायला जड होईल. ती राहू दे. मी वाळत घालते.

कु. सानिका : नको. या पूर्वी मी एका आजींची नऊवारी साडी वाळत घातली आहे. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने मी ‘नऊवारी साडी कशी वाळत घालायची ?’, हे शिकले आहे.

३. ‘संतांना साहाय्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सक्षम केले आहे’, असे सांगणारी कु. सानिका !

सानिका मला प्रसाद-महाप्रसाद देण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी दिवसातून ५ – ६ वेळा जिन्यावरून वर-खाली करायची. एकदा त्याविषयी आमच्यात पुढील संभाषण झाले.

पू. सुमनमावशी : सारखे वर-खाली करून तुझे पाय दुखत नाहीत का ? तुला दमायला होत नाही का ?

कु. सानिका : मी संतांना साहाय्य करत आहे. त्यासाठी गुरुदेवांनी मला तेवढे सक्षम केले आहे. त्यामुळे माझे पाय दुखत नाहीत.

सानिकाचे हे उत्तर ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘एखाद्या वेळी माझ्या घरातील व्यक्तींनाही ‘इतक्या वेळा वर-खाली केल्यावर पाय दुखतात’, असे वाटले असते; परंतु सानिका अगदी आनंदाने आणि उत्साहाने सर्व करते.’

‘गुरुराया, तुम्ही या मुलीला (सानिकाला) एवढे छान घडवले आहे की, मी तुमच्याप्रती जितकी कृतज्ञता व्यक्त करू, तितकी अल्पच आहे. सानिकामुळे माझ्यातील कृतज्ञतेचा भाव वाढला आहे.’

– (पू.) श्रीमती सुमन नाईक, फोंडा, गोवा. (६.६.२०२१)