भाजपचे एन्. बीरेन सिंह सलग दुसर्‍यांदा होणार मणीपूरचे मुख्यमंत्री !

निर्मला सीतारामन् आणि एन्. बीरेन सिंह

गौहत्ती (आसाम) – एन्. बीरेन सिंह हे मणीपूरचे नवे मुख्यमंत्री होणार, असे भाजपने जाहीर केल्याने सिंह हे सलग दुसर्‍यांदा हे पद भूषवणार आहेत. मणीपूर येथील विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भाजपने आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचे दायित्व कुणाकडे सोपवले जाईल, हे स्पष्ट केले नव्हते. निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.