(म्हणे) ‘राष्ट्रवादी होण्यासाठी हिंदू असणे आवश्यक ठरवले जात आहे !’

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे हिंदुद्वेषी विधान !

  • ‘भारतात राष्ट्रवादी होण्यासाठी हिंदू असण्याची आवश्यक आहे’, असे हिंदूंनी कधीही म्हटले नसेल, तरी कश्यप यांच्यासारखे जन्महिंदू मात्र जाणीवपूर्वक राष्ट्रवादी हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठी अशी विधाने करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती डॉ. ए.पी.जी अब्दुल कलाम हे प्रखर राष्ट्रभक्त होते; मात्र त्यांना मुसलमानांनी तितके जवळ केले नाही कि त्यांचा सन्मान केला नाही, याविषयी कश्यप का बोलत नाहीत ? – संपादक
  • भारतात राहुन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांविषयी कश्यप कधीच तोंड उघडत नाहीत, यावरून तरी भारतीय लोकांना कोण राष्ट्रावादी आणि कोण देशद्रोही आहे, हे लक्षात येते ! – संपादक
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ हे एक असे राज्य आहे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देतो. (केरळमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्याविषयी कश्यप का बोलत नाहीत ? – संपादक) सध्या राष्ट्रवादी विचारांना चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे. राष्ट्रवादी होण्यासाठी हिंदू असणे आवश्यक ठरवले जात आहे, असे विधान चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केले.

सौजन्य : Bollywood News Hindi

‘आधुनिक चित्रपट निर्माते राजकीय विषयांना प्रामाणिकपणे मांडण्यास घाबरत आहेत’, असेही अनुराग कश्यप या वेळी म्हणाले. (कश्यप स्वतःहून असे चित्रपट का करत नाहीत ? आणीबाणीच्या वेळी काँग्रेसने केलेला अत्याचार ते का दाखवत नाहीत ? – संपादक)