बेगूसराय (बिहार) येथे होळीच्या दिवशी धर्मांधांच्या जमावाने केलेल्या आक्रमणात २० हून अधिक हिंदू घायाळ !

आक्रमणाच्या वेळी पोलीस निष्क्रीय राहिल्याचा बजरंग दलाचा आरोप

  • बिहारमध्ये भाजपचे युती सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना  अपेक्षित आहे ! – संपादक 
  • ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी देणार आहेत ? – संपादक 

बेगूसराय (बिहार) – येथील रजौरा गावात होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर रायफल, तलवार आदी घातक शस्त्रांद्वारे आक्रमण केले. यात २० हून अधिक हिंदू घायाळ झाले. यांतील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. लहान मुलांच्या क्षुल्लक वादातून ही घटना घडली. बजरंग दलाने दिलेल्या माहितीनुसार ३०० हून अधिक धर्मांधांनी येथील सरस्वती मंदिराजवळ असणार्‍या हिंदूंवर आक्रमण केले. ‘रजौरा गाव धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असतांना पोलीस निष्क्रीय राहिले’, असा आरोप त्यांनी केला.

रजौरामध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, तर ते कुठे जाणार ? – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची खंत

या घटनेची माहिती मिळाल्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी रजौरा येथे जाऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घायाळ हिंदूंची विचारपूस केली. सिंह यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना विचारले की, बेगूसरायच्या रजौरामध्ये हिंदू सुरक्षित नसतील, तर ते कुठे जातील ? ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर मी रात्रभर झोपू शकलो नाही. पाकिस्तानमधील हिंदूंना ठार करण्यात आले. त्यांचे धर्मांतर करण्यात आले. बांगलादेशामध्ये मंदिरे पाडण्यात आली. बेगूसराय येथे लहान मुलांच्या वादानंतर तलावारीद्वारे हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. जर या घटनेच्या प्रकरणी प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केली, तर मला कठोर पावले उचलावी लागतील.