संभाजीनगर येथील ‘मटका किंग’ (जुगारी) आबेद पठाण याचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

हे आहे काँग्रेसचे खरे स्वरूप ! असे पक्ष लोकशाहीसाठी कलंकच म्हणावे लागतील ! अशा पक्षाला जनतेने राजकीयदृष्ट्या संपवल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक

पैठण तालुक्यातील कुख्यात ‘मटका किंग’ (जुगारी) आबेद कासम पठाण

संभाजीनगर – परभणी येथे १२ मार्च या दिवशी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कुख्यात ‘मटका किंग’ (जुगारी) आबेद कासम पठाण यास पक्षात प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित झाला. या पक्षप्रवेशाची छायाचित्रेही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहेत. पठाण याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. या पक्षप्रवेशावरून काँग्रेसवर टीका केली जात आहे.