होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

१७.३.२०२२ या दिवशी ‘होळी पौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…

अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः । अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ।। – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेला अग्नि), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.


होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र

वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च । अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ।। – ‘स्मृतिकौस्तुभ’

अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हेही वंदन करतात. त्यामुळे, तू आमचे रक्षण कर. आम्हाला वैभव देणारी हो.