सांगली, १६ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले. सर्वांनीच योग्य कृती करण्याचे आश्वासन दिले.
१. सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन खाडिलकर यांना निवेदन देण्यात आले.
२. ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज’चे श्री. भोसले यांना, ‘खाडे इंग्लिश मिडियम स्कूल’, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या भाजप नगरसेविका सौ. अनिता वनखंडे यांना निवेदन देण्यात आले.
३. विटा येथे स्व. किशाबापू कोंडोपंत गुळवणी माध्यमिक विद्यालयात श्री. डी.पी. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
४. मिरज येथे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड उपस्थित होते.
कुंडल पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार यांनी निवेदन स्वीकारले.
बारामती येथील साधना सत्संगातून ज्ञिज्ञासू सौ. अश्विनी विभूते यांनी होळी पौर्णिमेच्या मजकुराची फलकप्रसिद्धी केली.