हिंदूंना धर्मांध बनवण्यासाठीचा धर्मांतराचा नवीन प्रकार ! हिंदूंनो सतर्क राहून स्वतःच्या स्थितीचा अपलाभ घेऊन धर्मांतर करत असतील, तर त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करा. – संपादक
बीड – येथील परळी तालुक्यातील मांडवा येथील ज्ञानेश्वर नागरगोजे या ३५ वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा अपलाभ घेऊन येथील समाजकंटकांनी ‘तुला अडचणीतून सोडवतो, पैसे देतो आणि मुसलमान मुलीबरोबर लग्नही लावतो’, असे आमीष दाखवून घोषणापत्र लिहून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. काही वर्षांपासून नेहमीच प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या ज्ञानेश्वरच्या मानसिक स्थितीचा अपलाभ घेऊन त्याची दिशाभूल करून त्याचे धर्मांतर करण्याचा प्रकार झाला असावा, असे त्याचे नातेवाइक आणि ग्रामस्थ यांनी सांगितले. दिशाभूल करून कुणाचे धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. आमीष दाखवणे, पैसे देणे, हे या प्रकारात मोडते, असे अधिवक्ता राजेश्वर देशमुख यांनी सांगितले.
यावर ज्ञानेश्वरने नोटरी केलेल्या दुसर्या बाँडमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, मी हिंदु असून ११ फेब्रुवारी २०२२ या दिवशी माझी मानसिक स्थिती ठीक नसल्याचा अपलाभ घेऊन परळी आणि बीड येथील समाजकंटकांनी माझ्याकडून घोषणापत्र लिहून घेतले आहे. मला मुसलमान धर्माची तत्त्वे मान्य नाहीत, मी मुस्लिम धर्माचा कधीही अभ्यास केलेला नाही. माझे ‘महंमद शाहजाद मनोहर’ असे नावही मी पालटलेले नाही आणि त्याविषयी ‘गॅझेट’ प्रसिद्ध केलेले नाही.