मागणे हेची आता, या अज्ञानी बालकांना चरणांशी घ्यावे देवा ।

उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

सौ. सुनीता पंचाक्षरी

 

आई जशी लेकरांसाठी तळमळती ।
तशीच सद्गुरु माई (टीप १) आमच्याकडे लक्ष देती ।। १ ।।

देवा, तुला ज्ञात होते, हा काळ पेलण्या आम्ही आहोत असमर्थ ।
सोलापूरला पाठवलेस सद्गुरु माईस आम्हा करण्यास समर्थ ।। २ ।।

देवा, कितीही जन्म घेतले, तरी तुझे ऋण नाही फिटणार ।
तुझे उपकार आम्हा अज्ञानी जिवांना नाही हो कळणार ।। ३ ।।

आम्हा बालकांना कळू दे तुझा साक्षात्कार ।
किती रूपांनी दाविशी आम्हा तुझा दैवी चमत्कार ।। ४ ।।

साष्टांग दंडवत घालितो, आम्ही पामर या पवित्र चरणांशी ।
मागणे हेची देवा, या अज्ञानी बालकांना घ्यावे चरणांशी ।। ५ ।।

टीप १ – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

– सौ. सुनीता पंचाक्षरी, सोलापूर (४.४.२०२०)