धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. तमिळनाडूमधील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. तेथील मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकांसाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. याचा प्रभाव येथील प्रशासनावर आहे. कर्नाटकमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ पारित झाला आहे. तमिळनाडूमध्येही असा कायदा करण्याची मागणी आम्ही केली आहे.