मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी काही दिवसांसाठी मी त्यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(कै.) श्रीमती उपदेश आनंद
श्रीमती रजनी नगरकर

१. श्रीमती आनंदकाकू यांना कोणतीच वस्तू वाया घालवलेली आवडत नसे.

२. प्रेमभाव

अ. त्या स्वतःच्या मुलींवर जसे प्रेम करायच्या, तसेच प्रेम त्या त्यांचे जावई श्री. सुनील मेहता यांच्यावरही करत.

आ. आम्ही त्यांच्या घरी वास्तव्याला होतो. तेव्हा त्या ‘आम्हाला सगळे मिळाले का ? काही न्यून नाही ना ?’, याकडे लक्ष देत.

३. त्यांना काही हवे असल्यास त्या शांतपणे स्वतःच घेत असत. यामागे ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा त्यांचा उद्देश असे.

४. मुलीचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा; म्हणून तिला अधिकाधिक काळ आश्रमातच राहू देणे

त्यांची मोठी मुलगी सुश्री (कु.) दीपिकाताई हिला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. अधिकाधिक काळ आश्रमात राहिल्याने तेथील चैतन्यामुळे तिला आध्यात्मिक लाभ होऊन तिचा त्रास न्यून व्हावा’, यासाठी काकू तिला आश्रमातून घरी बोलावत नसत.

‘श्रीमती आनंदकाकूंची पुढील उन्नती होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना ! माझ्या लक्षात आलेली त्यांची ही गुणवैशिष्ट्ये मी गुरुचरणी अर्पण करते.’

– रजनी नगरकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.