पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

होळी-रंगपंचमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीची ‘संस्कृती रक्षण’ मोहीम !

विजय पाटील यांना निवेदन देतांना (उजवीकडून) कृष्णा पाटील, विनायक रोडगे, प्रसाद येवले, स्वप्नील जाधव

पुणे – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि खडकवासला कालवा विभाग यांना निवेदने देण्यात आली. या वेळी धर्मप्रेमी श्री. दत्तात्रय कुलकर्णी, श्री. प्रसाद येवले, श्री. विनायक रोडगे, श्री. स्वप्नील जाधव, समितीचे श्री. कृष्णा पाटील उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देतांना डावीकडून दत्तात्रय कुलकर्णी, प्रसाद येवले, विनायक रोडगे (उंच आहेत ते)

पुणे येथे जिल्ह्याधिकार्‍यांना देण्यात आलेली निवेदने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी हिम्मत खराडे यांनी स्वीकारली. या वेळी ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेच्या १९ वर्षांच्या यशस्वीतेविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना अवगत केले.