पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यास टाळाटाळ !

पुणे – पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत खासगी अनुदानित शाळांमध्ये अवैधरित्या शिक्षक भरती केल्याप्रकरणी राज्यशासनाची अनुमती न घेता पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी दिले होते; परंतु केवळ चौकशी समिती नियुक्त करून वेळकाढूपणा केला जात आहे. या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २८ जणांवर गुन्हे नोंद झाले. शिक्षण उपसंचालकांनी शासनाची संमती न घेता गुन्हे नोंद करण्यास अनुमती दिल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले होते.