सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ४.१.२०२२ आणि ५.१.२०२२ या दिवशी कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले. या नृत्यप्रकारांचा अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन प्रकारच्या साधकांच्या गटांवर प्रयोग करण्यात आला. देवाच्या कृपेने माझ्याकडून कथ्थक नृत्य प्रयोगाच्या झालेल्या सूक्ष्म परीक्षणातील काही सूत्रे येथे दिली आहेत. १०.३.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात सौ. सोनियाताई यांनी नृत्यप्रयोगाचा आरंभ ‘कस्तुरी तिलकं…’ या श्लोकावर आधारित श्रीकृष्ण वंदनेने करणे, त्यांनी पंचम सवारी या सहसा पखवाजावर वाजवल्या जाणार्या खुल्या बोलांच्या अनवट (प्रचलित नसलेल्या) तालावर नृत्य करणे ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/560240.html
३. भावपक्षामध्ये (टीप १) विविध भूमिका करून केलेले नृत्य
टीप १ – भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा भावपक्ष म्हणजे, नृत्यातील नाट्य. नृत्याचा असा भाग ज्यात नृत्यातील हालचालींसह निरनिराळ्या भावभावना व्यक्त केल्या जातात. त्यात प्रेक्षकांपर्यंत नृत्य, कथानक यांतील आनंद पोचवण्याची क्षमता असते. तसेच तो बोधप्रदही (प्रबोधन करणारा) असतो. तो नृत्याचा ‘भावपक्ष’ होय.
३ ई. खंडिता आणि राधिका या नायिका यांच्यामध्ये सूक्ष्म स्तरावर जाणवलेला भेद
टीप १ – अनाहतचक्र हे व्यक्तीतील भाव आणि भावना यांच्याशी संबंधित असल्यामुळे नृत्याच्या वेळी दोन्ही खंडितांच्या प्रकारांच्या वेळी साधिकेच्या भाव अन् भावना जागृत झाल्यामुळे तिच्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवल्या.
टीप २ – खंडिता नायिकेच्या वेळी भावना जागृत होऊन सूर्यनाडी चालू झाल्यामुळे सौ. सोनिया परचुरे यांच्या डोळ्यांतून वहाणार्या अश्रूधारा गरम होत्या. राधिका नायिकेच्या वेळी सौ. सोनियाताईंचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत झाल्यामुळे त्यांची सुषुम्नानाडी चालू झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून वहाणार्या अश्रूधारा शीतल होत्या.
तात्पर्य : ‘नृत्यकलेतून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी आणि नृत्यातून आध्यात्मिक स्तरावरील उपाय होण्यासाठी नृत्याचा केंद्रबिंदू ‘मायेतील विषय’ न निवडता भगवंत आणि त्याच्या लीला असणे किती महत्त्वाचे आहे,’ हे आपल्याला सारणीतून लक्षात येते.
४. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘जय जय रामकृष्ण हरि’ या नामाच्या गजरावर कथ्थक नृत्य सादर नृत्य करणे
या नामाच्या गजरावर नृत्य करत असतांना सौ. सोनियाताईंनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनात घडलेल्या विविध प्रसंगांचे वर्णन करतांना प्रभु श्रीराम, सीतामाता, हनुमान, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन इत्यादींच्या भूमिका नृत्यातून सुंदररित्या सादर केल्या. तेव्हा प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या दिव्य लीला नृत्यातून अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली अन् विविध प्रसंगांशी संबंधित असणारे विविध प्रकारचे भावही आमच्यात जागृत झाले. उदा. ‘सीता स्वयंवराच्या वेळी प्रभु श्रीरामाने शिवधनुष्य भंग केल्यानंतर सीतामातेने प्रभु श्रीरामाच्या गळ्यात वरमाला घातली’, हा प्रसंग नृत्यातून दाखवतांना सौ. सोनिया परचुरे यांनी सीता अन् प्रभु श्रीराम यांच्या भूमिका इतक्या अचूक आणि हुबेहुब केल्या होत्या की, सीतास्वयंवराचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा राहिला. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांनी हनुमानाची भूमिका सादर केली, तेव्हा ‘सौ. सोनियाताईंच्या ठिकाणी कधी दास्य, तर कधी वीर मुद्रेतील हनुमान प्रत्यक्ष उभा आहे’, अशी मला प्रचीती आली. यावरून ‘सौ. सोनियाताईंमध्ये नृत्यकलेसह अभिनयकलाही त्यांच्या रोमरोमांत भिनलेली आहे’, असे जाणवले. सौ. सोनियाताई कथ्थक नृत्यातून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विविध लीला अन् रूपे सादर करत असतांना त्यांच्या मुखावरील भावांमध्ये नाट्यशास्त्रातील विविध नवरस प्रकट होऊन त्यांचे नृत्य परिपूर्ण झाल्याची प्रचीती आली.
४ अ. सौ. सोनियाताई कथ्थक नृत्यातून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विविध लीला अन् रूपे सादर करत असतांना त्यांच्या मुखावर दिसलेले विविध प्रकारचे भाव
कृतज्ञता : ‘देवाने सौ. सोनियाताईंच्या नृत्यप्रयोगाचे सूक्ष्म परीक्षण करवून घेतल्याबद्दल मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
(समाप्त)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२२)
|