‘कोणतीही माहिती अंतिम करण्यासाठी प्रथम अनेक ग्रंथांचे वाचन करावे लागते. त्याच्या आधारे विविध प्रयोग करावे लागतात. त्यानंतर त्याविषयी निष्कर्ष काढू शकतो. यासाठी काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंतचाही कालावधी द्यावा लागतो. याउलट संतांना सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान, हे सर्वांगांनी परिपूर्ण असते. त्यामध्ये काहीच पालट होत नाही. त्यामध्ये संशोधन करण्यासाठी वेळ द्यावा लागत नाही. साधकांनी त्यासाठी केवळ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे आवश्यक असते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.१.२०२२)