
एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो शिकारीसाठी निघाला असतांना वाटेत शिवाच्या देवळात भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. ‘दगडाला देव मानणारे मूर्ख लोक ‘शिव शिव’ आणि ‘हर हर’ म्हणत आहेत’, अशी त्यांची चेष्टा करत तो वनात गेला. सावज पहाण्यासाठी तो एका झाडावर चढून बसला; पण पानांमुळे त्याला सावज दिसेना. तो एक एक पान तोडून फेकू लागला. त्या वेळी तो ‘शिव शिव’ असे म्हणत होता. ती पाने झाडाखाली असलेल्या शिवाच्या पिंडीवर त्याच्या नकळत पडत होती. पहाटे एक हरीण त्याला दिसले. व्याध त्याला बाण मारणार; एवढ्यात हरिणाने त्याला न मारण्याची प्रार्थना केली. पाप केल्याने काय होते तेही व्याधाला सांगितले आणि ते हरीण निघून गेले. नकळत झालेले महाशिवरात्रीचे जागरण, शिवाला झालेले बिल्वार्चन आणि शिवाचा जप यांमुळे व्याधाची पापे नष्ट होऊन त्याला ज्ञान प्राप्त झाले.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !