|
मधुबनी (बिहार) – मुसलमान एका धोरणानुसार काम करतात. या धोरणानुसार भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा त्यांचा विचार आहे. भारताच्या वर्ष १९४७ मध्ये झालेल्या फाळणीच्या वेळी आपण मुसलमानांना वेगळा देश दिला. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जायला हवे . जर त्यांना भारतात रहायचे असेल, तर त्यांनी दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहिले पाहिजे. आम्ही सरकारला विनंती करतो की, मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, असे विधान येथील बिसफी मतदारसंघातील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी केले. या विधानानंतर भाजपने ठाकूर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली असून ‘या विधानाचा नक्की काय अर्थ आहे ?’, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
बीजेपी विधायक हरि भूषण ठाकुर का विवादित बयान #Bihar #BJP (Rohit_manas)https://t.co/j8MJ0s1RbD
— AajTak (@aajtak) February 24, 2022
बिहारमध्ये भाजपसमवेत सत्तेत असणार्या संयुक्त जनता दलाने या विधानाचा निषेध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते निरज कुमार यांनी ठाकूर यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचे म्हटले आहे.