(केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांची जिहाद्यांकडून निर्घृण हत्या करण्याचे सत्र चालू आहे. त्याला ‘केरळ मॉडेल’ म्हटले जाते.)
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये हर्ष यांची ज्या प्रकारे हत्या केली गेली, तशा प्रकारच्या हत्या आम्ही पहात आलो आहोत. हे पहिल्यांदा घडलेले नाही. हे आतंकवादाचे ‘केरळ मॉडेल’ आहे, असे विधान भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले आहे. त्यांनी शिवमोग्गा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी कर्नाटक आणि देशात अशा प्रकारच्या घटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या संघटना आहेत, असा दावाही केला.
1. Harsha’s isn’t isolated murder but act of terror. Need to prosecute u/s 16 of UAPA
2. Set up exclusive agency to monitor, investigate & preempt terror
3. Amend KCOCA to declare these outfits as organised crime syndicate
4. Submit detailed dossier to GOI to ban PFI, SDPI pic.twitter.com/NgwhULHjZS
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) February 22, 2022
खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की,
१. हर्ष हे बजरंग दलाचे एक समर्पित कार्यकर्ता होते ते हिंदुत्वासाठी जगले आणि हिंदुत्वासाठीच त्यांनी प्राण दिला.
२. कर्नाटकमधील वाढत्या इस्लामी कट्टरतावादाने हर्ष यांचे प्राण घेतले आहेत. मी सरकारकडे मागणी करतो की, ही हत्या नसून हे आतंकवादी कृत्य आहे. या प्रकरणी कलम ३०२ नुसार (खुनासाठी लावण्यात येणार्या कलमानुसार) नाही, तर अवैध कृत्य अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
३. ही हत्या व्यक्तीगत कारणांमुळे झालेली नाही. केवळ हर्ष हिंदुत्वासाठी काम करत असल्याने त्यांची हत्या झाली आहे. हत्या करणार्यांनी सुपारी घेऊन हत्या केली, तर मुख्य सूत्रधार पडद्यामागे आहेत.
बजरंग दल कार्यकर्ता हत्या केस: बीजेपी सांसद सूर्या बोले- कर्नाटक में निर्यात हो रहा है ‘आंतक का केरल मॉडल’https://t.co/8dqlGkN1kD pic.twitter.com/wyagbJj6XH
— BBC News Hindi (@BBCHindi) February 22, 2022