‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करतांना देवाने माझ्यावर केलेला कृपावर्षाव पुढे दिला आहे.
१. मी रामनाथी आश्रमात रहात असतांना मला ‘आश्रम म्हणजे पंढरपूर आहे’, असे वाटते, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले विठ्ठल आहेत’, असे मला वाटते.
२. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हसतांना पाहून ‘ते साक्षात् देव असून साधकांना ब्रह्मांड अनुभवायला देत आहेत’, असे जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी मी त्यांना मला त्यांच्याविषयी येणार्या वरील अनुभूतीविषयी सांगितले. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ते हसत असतांना ‘ते साक्षात् देव असून साधकांना ब्रह्मांड अनुभवायला देत आहेत’, असे मला वाटले. मला त्यांचे हसणे वेगळेच जाणवले आणि माझा भाव जागृत झाला.
३. परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : मी सेवा करतांना कधी कधी ‘परात्पर गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते. मला त्यांचा स्पर्श जाणवतो आणि त्यांचा आवाजही ऐकू येतो.
‘प.पू. गुरुदेवा, तुम्ही मला इतके दिले आहे की, मी ते व्यक्तही करू शकत नाही. हे गुरुदेवा, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अनिकेत जमदाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |