एका मुसलमान आणि बांगलादेशी महिला लेखिकेला असे वाटते आणि ती ते उघडपणे सांगते, तर भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी वलयांकित महिला गप्प का आहेत ? हिंदूंच्या संदर्भात असे काही असते, तर त्यांनी तात्काळ त्यांची तोंडे उघडली असती आणि हिंदूंना उपदेशाचे डोस पाजले असते ! – संपादक
नवी देहली – हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) हा महिलांना ‘लैंगिक वस्तू’ बनवतो. एखाद्या धर्मनिरपेक्ष देशातील एका शैक्षणिक संस्थेला तिच्या विद्यार्थ्यांसाठी धर्मनिरपेक्ष गणवेश अनिवार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर अशा संस्था तुम्हाला ‘तुमची धार्मिक ओळख घरीच ठेवा’, असे सांगत असतील, तर त्यात काहीही चूक नाही. शाळेत धार्मिक कट्टरता आणि अंधश्रद्ध यांना जागा असू शकत नाही. शाळांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, लैंगिक समानता, उदारमतवाद, मानवता आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाला मुलाखत देतांना केले आहे.
तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या की, हिजाब, बुरखा आणि नकाब यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे स्त्रीचे उपभोग्य वस्तूरूपात रूपांतर करणे. जरी महिलांना पाहून लाळघोटेपणा करणार्या पुरुषांपासून महिलांना लपण्याची आवश्यकता असते, तरीही ही प्रथा अतिशय अपमानास्पद आहे. ही प्रथा लवकरात लवकर बंद केली गेली पाहिजे.
तसलीमा ने हिजाब को बताया उत्पीड़न का प्रतीक, कहा- ‘ये तब सही था जब महिलाएं Sex Objects थीं ‘ #taslimanasreen #bangladesh #muslim https://t.co/dC46yGdlQM
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) February 17, 2022
७ व्या शतकात बनलेले कायदे २१ व्या शतकात पाळायची आवश्यकता आहे का ? – नसरीनहिजाब आणि इस्लाम एकमेकांशी संबंधित आहेत किंवा नाही, हे सूत्र नसून मुळात ७ व्या शतकात बनलेले कायदे २१ व्या शतकात पाळायची आवश्यकता आहे का ?, हे आहे. हिजाब किंवा बुरखा ही एखाद्या महिलेची आवड कधीच नसेल, हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. तो एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या ओळखीचा अविभाज्य घटक होऊच शकत नाही. |