ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

गोव्यात विधानसभा निवडणुकीमध्ये ‘काँग्रेसच्या ३७ उमेदवारांपैकी १७, भाजपच्या ४० पैकी १२, ‘आप’च्या ३९ पैकी ९, तृणमूल काँग्रेसच्या २६ पैकी ७, ‘मगोप’च्या १३ पैकी ६, ‘रिव्हॉल्यूशनरी गोवन्स’च्या ३८ पैकी ५, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी ४, तसेच गोवा फॉरवर्ड, ‘गोयंचो स्वाभिमान पक्ष’, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार, तसेच अपक्ष ६८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत. ४० पैकी ३७ मतदारसंघांत गुन्हे नोंद असलेले उमेदवार आहेत.’