परात्पर गुरु डॉ. आठवले : आतापर्यंत तुझ्या लिखाणात कृतज्ञता म्हणून श्रीकृष्णाचा उल्लेख केला जात असे. हल्ली माझ्या नावाचा उल्लेख केलेला असतो. तो कधीपासून आणि का केला जातो ?
कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के): जून २०२१ पूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये अद्वैत जाणवत होते. येणार्या आपत्काळात जगातील विविध देशांमध्ये रहाणार्या साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि काळानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीकृष्णाचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाले आहे. मला थेट श्रीकृष्णाचे तत्त्व ग्रहण करता येत नाही; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून ते ग्रहण करता येते. त्यामुळे जून २०२१ पासून मला मिळालेल्या ज्ञानाच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी काहीही ठरवले नसतांना माझ्याकडून श्रीकृष्णाचा उल्लेख न होता आपोआप परात्पर गुरुदेवांचा उल्लेख होत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : इतरांची आध्यात्मिक प्रगती होतांना ते गुरूंकडून देवाकडे जातात, तर मधुराची प्रगती होतांना ती श्रीकृष्णाकडून माझ्याकडे येत आहे.