कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थी आणि नागरिक यांसाठी ‘पुस्तकांची वारी आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाविषयी ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘‘शहरातील विविध २४ थांब्यांवर ठराविक वेळेमध्ये हे फिरते ग्रंथालय सर्वांसाठी विनामूल्य चालू रहाणार आहे. या ठिकाणी आपण नोंद करून घेतलेली पुस्तके आठवडाभर वाचनासाठी मिळतील.’’ या प्रसंगी आदिनाथ यादव, सचिन साळोखे, धीरज पाटील, मयूर पाटील, चंद्रकांत आयरेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.