अशाप्रकारे पुणे पोलिसांची तत्परता आणि न्यायालयाने दिलेला त्वरित निकाल गुन्हेगारांवर वचक निर्माण करेल. असे सर्वत्रच होणे अपेक्षित आहे ! – संपादक
पुणे – विनयभंगातील आरोपी समीर जाधव याला अवघ्या ७२ घंट्यांत शिवाजीनगर न्यायालयाने १८ मास कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हिंजवडीत समीर जाधवने एका महिलेच्या घरी जाऊन तिच्या मुलांसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केला होता. या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. पहिल्या ३६ घंट्यांत हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या, तर पुढील ३६ घंट्यांत न्यायालयाने निकाल देत आरोपीला शिक्षा सुनावली आहे.