अनंतनाग येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथील हसनपोरा भागामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी भर वस्तीत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अली महंमद गनी हे पोलीस हवालदार हुतात्मा झाले. या आक्रमणानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.

गेल्या १२ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

गेल्या १२ घंट्यांत सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांच्या ५ आतंकवाद्यांना ठार केले. यात जैश-ए-महंमदचा कमांडर जाहिद वानी आणि एक पाकिस्तानी आतंकवादी यांचा समावेश आहे. बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ आणि पुलवामा जिल्ह्यातील नायरा येथे ही कारवाई करण्यात आली.