फेसबूक झाले ‘अनैतिक’ बूक, अनीती स्वस्त झाली ।
छोट्या मुलांसह सर्वांनाच ‘मोबाईल’चे वेड लावले ।। १ ।।
जाणूनबुजून षड्यंत्र हे रचले ।
आता हिंदु धर्माचे संस्कार सर्वांवर होणे महत्त्वाचे ।। २ ।।
जेवण झाले उपाहारगृहातील, आरोग्य कसे आणि कुणाला लाभेल ।
व्यवसाय झाले ‘ऑनलाईन’, सुख-समृद्धी कुठे सापडेल ।। ३ ।।
नातेवाइक दूर झाले, मित्र, शत्रू ओळखायचे कसे ।
आता हिंदु धर्माचे संस्कार सर्वांवर होणे महत्त्वाचे ।। ४ ।।
फुले झाली प्लास्टिकची, सुगंध कसा लाभेल ।
तोंड झाले ‘मेकअप’चे, मराठी स्वरूप कुठे हरवले ।। ५ ।।
दुराचारी सर्वत्र स्वार्थी झाले, भगवंत केवळ भक्तीतच सापडे ।
जगाला आता हिंदु धर्माचे संस्कार महत्त्वाचे ।। ६ ।।
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा. (६.९.२०२१)