ही घटना चुकून घडली कि जाणीवपूर्वक घडवण्यात आली, याची चौकशी केली पाहिजे ! – संपादक
कासारगोड (केरळ) – येथील पालकमंत्री आणि इंडियन नॅशनल लीगचे नेते अहमद देवरकोविल यांनी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करतांना राष्ट्रध्वज उलटा फडकावला. इतकेच नव्हे, तर या वेळी उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव सक्सेना, प्रभारी जिल्हाधिकारी ए.के. रामेंद्रन् आणि अन्य पोलीस यांनी त्याला मानवंदना दिली. ही चूक काही पत्रकारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अधिकार्यांना याविषयी सांगितल्यावर राष्ट्रध्वज नीट करून पुन्हा फडकावण्यात आला.
Kerala Minister unfurls Tricolour upside down, BJP seeks probe into incident https://t.co/8K4MsmWyOG
— Republic (@republic) January 26, 2022
वरील छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |