खांडवा (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धर्मांध युवक आणि हिंदु युवती यांना हॉटेलमध्ये पकडले !

धर्मांधाने हिंदु युवतीची खोटी ओळख सांगून हॉटेलमध्ये घेतला आश्रय !

हिंदु पालक त्यांच्या मुलींना धर्मशिक्षण देत नसल्यामुळे त्या धर्मांध तरुणांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने त्याच्या अपत्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! – संपादक

हॉटेलमध्ये पोलीस चौकशी करताना

खांडवा (मध्यप्रदेश) – येथे धर्मांधासमवेत एक हिंदु युवती हॉटेलमध्ये थांबल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी दोघांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांना ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास सांगितले. धर्मांधाने हिंदु युवतीची खोटी ओळख दाखवून हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. माध्यमांमध्ये धर्मांधाचे नाव अक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे.

१. याप्रकरणी युवतीची चौकशी करण्यात आली. तिने सांगितले, ‘मी सज्ञान असून स्वेच्छेने या युवकासमवेत हॉटेलमध्ये थांबवली होती.’ ‘युवतीवर दबाव असल्यामुळे ती चुकीची साक्ष देत आहे’, असे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

२. पोलीस म्हणाले, ‘‘युवती एम्.बीए असून दोघेही सज्ञान आहेत. त्यामुळे ‘युवतीवर कोणताही दबाव आहे’, असे वाटत नाही. दोघेही सायंकाळी ६ वाजल्यापासून हॉटेलच्या शोधात होते. हॉटलेचालकांना प्रकरण संशयास्पद वाटले. त्यामुळे त्यांनी या दोघांना त्यांच्या हॉटेलमध्ये जागा दिली नव्हती.

३. त्यानंतर ते ‘हॉलिडे-इन’च्या मालकाने त्यांना रहाण्यास जागा दिली. ‘युवतीला खोट्या ओळखीवर थांबवल्यामुळे हॉटेलमालकावरही कारवाई करावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. यावर ‘संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कारवाई करण्यात येईल’, असे पालिसांनी सांगितले.

४. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती युवतीच्या कुटुंबियांना दिली आहे, असे कळले. असे असले, तरी ‘न्यूज १८’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी ‘हे वैयक्तिक प्रकरण असल्याने याविषयी युवतीच्या कुटुंबियांना माहिती दिलेली नाही’, असे सांगितले. (मुसलमान युवती हिंदु युवकासोबत पळून गेली असती, तर पोलिसांनी काय केले असते ? – संपादक)