निवडणुकांचे निकाल केवळ ‘सरकारच्या कामगिरी’वर अवलंबून नसून अनेक घटकही महत्त्वाचे !

श्री. भारत आमदापुरे

स्वातंत्र्योत्तर भारतात लोकसभा निवडणुकीचे निकाल दोनदा आश्चर्यकारक आणि निराशाजनक लागलेले दिसतात.

१. आणीबाणी लागू करून हुकूमशाही आणलेल्या इंदिरा गांधींना जनतेने पुन्हा वर्ष १९८० मध्ये प्रचंड बहुमताने निवडून दिले. अर्थात् यासाठी जनता पक्षाच्या सरकारमधील फाटाफुटीमुळे झालेला जनतेचा भ्रमनिरास हा मुद्दाही करणीभूत होता. तरीही लोकशाही गुंडाळून टाकणार्‍या हुकूमशाही वृत्तीच्या इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळणे, हे चिंताजनकच होते.

२. वर्ष २००८ मध्ये २६ नोव्हेंबर या दिवशी भारतावर सर्वांत मोठे जिहादी आक्रमण झाले. त्यासाठी तत्कालीन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा भोंगळपणा कारणीभूत असूनही वर्ष २००९ मध्ये पुन्हा काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार बहुमताने निवडून आले.

त्यामुळे सरकारच्या चांगल्या अथवा वाईट कामगिरीनुसार पुढचे सरकार निवडून येईलच का ?, याविषयी कधी कधी थोडेसे थांबून विचार करावा लागतो, तसेच ‘सरकारची कामगिरी’ या व्यतिरिक्त निवडणूक निकालावर परिणाम करणार्‍या अन्य घटकांचा विचार करावा लागतो.

– श्री. भारत आमदापुरे, अभियंता, पुणे.