मिरज येथील ‘मानस ब्लड बँके’ला वैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्याविषयी २५ सहस्र रुपये दंड !

वैद्यकीय कचरा

मिरज, १७ जानेवारी (वार्ता.) – मिरज येथील ‘मानस ब्लड बँके’ला वैद्यकीय कचरा महापालिकेच्या घंटागाडीत (कचरा टाकण्याची गाडी) टाकल्याविषयी २५ सहस्र रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. या अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आवाहन केले आहे की, वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट कचर्‍यासाठी असलेल्या विशेष नियमानुसार करणे वैद्यकीय व्यावसायिकांवर बंधनकारक आहे. हा कचरा त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आस्थापनांकडेच द्यावा. हा कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत अथवा घंटागाडीत टाकण्यात येऊ नये; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.