परात्पर गुरु डॉक्टर यांचे समाजाला मार्गदर्शन !
‘सध्याच्या काळात बर्याच कुटुंबांमध्ये एकच मूल असते. त्यामुळे त्याचे सर्व प्रकारचे लाड पुरवले जातात; परंतु असे करतांना पालक त्याच्या स्वभावदोषांकडे डोळेझाक करतात. अशा मुलांना स्वतःच्या वस्तू इतरांना देणे, न्यूनपणा घेऊन इतरांकडे मागणे आणि इतरांनी वापरलेल्या वस्तू वापरणे जमत नाही. पुढे ही मुले हट्टी होतात. त्यांचे प्रबळ झालेले स्वभावदोष त्यांना, कुटुंबियांना आणि समष्टीलाही त्रासदायक ठरतात.
याउलट घरात २-३ मुले असतील, तर सर्वांना समान वागणूक मिळते. एखाद्याची चूक असेल, तर त्याला त्याची जाणीव करून दिली जाते. प्रसंगी त्याला शिक्षाही केली जाते. त्यामुळे अन्य मुलांनाही ‘अशी अयोग्य कृती करू नये’, याची जाणीव होते आणि सर्वांना एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय लागते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.१२.२०२१)